RECENT POSTS

coronavirus vaccine

         

What  is  vaccine।लस  म्हणजे काय

        
        जगभरात  corona  विषाणूने थैमान  घातले आहे.अनेक शास्त्रज्ञ व औषध उत्पादन कंपन्या यावर संशोधन करत असले तरी आजतागायत covid -१९ या आजारावर समर्पित असे कोणतेही प्रभावी उपचार आहे.यातच हल्ली आपण Vaccine म्हणजेच लस हि संकल्पना सर्वत्र ऐकत आहोत.corona विषाणू ला हरवण्यासाठी लस हे एकमेव हत्यार असेल जे लाखो लोकांचे प्राण वाचवू शकेल असे शास्त्रज्ञांचे मत आहेत.परंतु लस म्हणजे नेमकं काय? नेमकी लस काम कशी करते ? असे प्रश्न अनेक वाचकांना पडला असेल.चला तर मग जाणून घेऊया याच vaccine(लस) बद्दल......


vaccine लस म्हणजे काय-
                 जेव्हा एखादा विषाणू मानवी शरीरात शिरकाव करतो तेव्हा मानवाची रोगप्रतिकारक प्रणाली (immune system)त्यावर हल्ला करून त्या विषाणूला निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करतो व त्यांचा संसर्ग होण्यापासून वाचवतो.परंतु ज्या वेळी एखादा नवीन विषाणू शरीरात प्रवेश करतो तेव्हा आपल्या शरीराच त्याचा परिचय नसतो.या मुले आपली रोगप्रतिकारक प्रणाली संसर्ग रोखू शकत नाही....
                      vaccine म्हणजेच लस याच विषाणूचा परिचय आपल्या शरीरास करून देते व पुढे होणाऱ्या संसर्गापासून बचाव करते.म्हणूनच एखाद्या संसर्गजन्य रोगाशी लढण्यासाठी लसीकरण हे सर्वात प्रभावी तंत्र आहे ज्यामूळे आजतागायत असंख्य लोकांचे प्राण वाचले आहेत..

vaccine मधे  नेमकं काय असत -
                ज्या विषाणूची लस निर्माण कमकुवत घटक किंवा निष्क्रिय अथवा मृत विषाणूचं शरीरात सोडला जातो.याप्रकारे आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीस त्या विषाणूची रचना , त्याचे गुणधर्म यांचा परिचय होतो.मानवी शरीर भविष्यातील येणाऱ्या विषाणूशी लढण्यास सज्ज होते.ज्या वेळी हा विषाणू  खरोखरच प्रवेश करतो त्या वेळी सहजरित्या त्याला हरवणे शक्य होते व त्याचे घातक  परिणाम रोखले जातात.polio , rubela , गोवर , यांसारख्या अनेक रोगांना आजपर्यंत लस

vaccine चे प्रकार  -
               

   live attenuated vaccines-

                        याप्रकारच्या लसीमध्ये विषाणूचा एक कमकुवत आणी विध्वंसक नसलेला विषाणूचा एक प्रकार शरीरात सोडला जातो.कमकुवत असल्याने हा विषाणू शरीरात पसरत नाही व कोणतीही हानी पोहोचवत नाही.परंतु रोगप्रतिकारक शक्तीस याचा परिचय होतो.

फायदे :-

 • वास्तवीक विषाणूचं शरीरात सोडल्याने हि लस जास्त प्रभावी ठरते.
 • १ ते २ डोस दिल्याने आजीवन रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते.

तोटे :-

 • कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींना हि लस धोकादायक ठरू शकते.
 • या लसींना विशेष वातावरणामध्ये ठेवावे लागते , उष्ण वातावरणात यातील विषाणूचा घटक मरू शकतो.

उदाहरण :-

 • measules 
 • Mumps 
 • Rubella 
 • Rotavirus 
 • chikenfox.

inactivated vaccines-

                        सर्वप्रथम chemical व उष्णता देऊन विषाणूस मारले जाते आणि त्याचे मृत पेशी शरीरामध्ये सोडले जातात.

फायदे:-

 • हि लस सहजरीत्या कोणत्याही वातावरणात साठवली जाऊ शकते .
 • मानवी शरीरावर याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही.

तोटे:-

 • मृत विषाणू वापरल्याने हि लस कमी प्रभावी असते.
 • मर्यादित कालावधीनंतर या लसीचे डोस पुन्हा द्यावे लागतात.

उदाहरण:-

 • polio 
 • hepatatis 
vaccine बनवण्याचे टप्पे   -
                        vaccine बनवणे हि एक मोठी प्रक्रिया आहे ज्यामध्ये अनेक टप्पे असतात.हे सर्व टप्पे पूर्ण करण्यास काही वर्षे किंवा दशके लागू शकतात.मुख्यतः पुढील ४ टप्पे एखादी लस बनवण्याच्या प्रक्रियेत असतात .


pre -clinical trail :-

                  या टप्प्यापढे vaccine चा डोस उंदीर , माकड यांसारख्या प्राण्यांना दिला जातो. या प्राण्यांमधील immune system चा प्रतिसादाचे निरीक्षण केले जाते व लसीचे किती प्रमाण उपयोगी ठरेल हे ठरवले जाते तसेच एखादी लस किती प्रभावी असेल याचा अनुमान लावला जातो.

Phase 1 safety trail:-

             ५ ते १० लोकांच्या छोट्या गटावर vaccine चा वापर केला जातो.त्यांच्यामधील होणारे बदल , immune response , लसीचे दुष्परिणाम याचा सखोल अभ्यास केला जातो.बहुतांश vaccines या टप्प्यामध्ये अयशस्वी होतात.

Phase 2 trials:-

           या टप्यामध्ये चाचणी करण्यात येणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढवली जाते . वयोमानाप्रमाणे बाल ,वृद्ध व तरुण असे विविध गट केले जातात व त्यांच्यावरील होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जातो.

Phase  3 trials:-

          संख्या व भोगोलिक क्षेत्र या टप्यामध्ये वाढवले जाते.vaccine बनविण्याच्या प्रक्रियेत हा शेवटचा टप्पा मानला जातो . जवळ जवळ ८०% चाचण्या या टप्प्यामध्ये अयशस्वी होतात .

Approval:-

     या टप्यामधील लस हि प्रभावी असते. प्रत्येक देशातील regulatory board vaccine ची सुरक्षितता तपासते व या लसीचे उत्पादन व विक्रीस परवानगी दिली जाते .


         

                     


              
Post a comment

0 Comments